Thursday, September 25, 2008

ती भेट


अजूनही आठवतेय
आपली ती भेट
बरेच होत मनात संगण्यासारख
पण बोललो नव्हतो थेट

नजरभे होताच
तू दिलेल स्मितहास्य
रहस्याचा उलगडा...
की अजुन एक रहस्य???

फारच कमी शब्द
मी कले होते कानांनी
बराच काही सांगितल
तुझ्या काळ्याभोर डोळ्यांनी

आठवतेय मला
हातावरील हस्तरेषा
नाजूक हात
वार्‍यवर उडणारे तुझे केस
आणि माझा कॉंडलेला श्वास

विराहाच्या कल्पनेने
घट्ट केलेली हाताची पकड
पाणावलेले डोळे
आणि हसण्याचा चुकलेला प्रयत्न

"पुन्हा भेटू आपण"
तुझे मला समजावून सांगण
डोळ्यातल्या एका थेंबाच
गालावरून घरांगळ जा

निरोपासाठी हलवलेले हात
नजर भेट शेवटची
एक मोठे प्रश्नचिन्ह
चल-बिचल मनाची

आठवतय मला...
आठवतय मला... ब्ररेच काही...